प्रेम
वेड्यासारखंच वागतात......
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.
यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं
मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात
रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.
डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात
गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात......
मन…......
वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्यात रुसुन बसतं….
कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…
कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…
कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…
कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….
कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट
कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा
एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं
असं गं कसं मन माझं मलाच समजेना..
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना....
ती........!
ती........
तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!
तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!
काय सांगू तुम्हाला.............
दरवाजा उघडताच
ती अगदी माझ्या डोळ्यांसमोर दिसते
तिलाच पाहून हल्ली मी विचारात पडतो...
-
ती माझ्या बरोबर
अगदी कॉलेजला सुद्धा सोबत जायची
येताना सुद्धा माझ्या सोबतच यायची...
-
तिच्या सहवासात
वेळ अगदी हसत हसत निघून जायची
घरी पोहचलो कधी हे समजत नसायचे...
-
दिवसभर आम्ही
वेड्या सारखे बाहेरच भटकत रहायचो
फिरता फिरता अचानक संद्याकाळ व्हायची...
-
तिच्या प्रेमात
मी मला स्वतःला विसरत चाललो होतो
तिच्यामुळेच मी सर्वांशी जिंकत आलो होतो...
-
काय सांगू तुम्हाला
हल्ली मी घराचा दरवाजा सारखा उघडतो
दरवाजा उघडला की, ती अगदी समोर दिसते...
माझी सायकल हो, अगदी समोर दिसते........
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात...
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...
एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..
मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..
मग जोडीदाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात.. जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..
आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात......!
किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं.....!
कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं....
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं.......
एवढे एक करशील ना ?.....
एवढे एक करशील ना ?
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
.......मी निशब्द.......
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच.. बसलो एका थडग्याजवळ जाऊन....
थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय.. २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'
.......मी निशब्द.....
तर ते आहे प्रेम.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड........!
तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटता,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री........!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम...!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम......!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता..,
तर ते आहे प्रेम.......!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल.,
तर ते आहे प्रेम.........!
त्या दिवशी वाळूवर बसून मावळतीचा सूर्य पाहताना.......!
त्या दिवशी वाळूवर बसून मावळतीचा सूर्य पाहताना माझ्या एकटेपणाची जाणीव प्रकर्षाने झाली. समोर अथांग पसरलेला समुद्र...त्याच्या कुशीत शिरण्यासाठी आतुर असलेला तो सोन्याचा गोळा..दुरवर दिसणारे ते खड़क ...आणि त्यावर आदळणाऱ्या फेसाळत्या लाटा...किनारयालगतची उंचच उंच नारळाची झाड..आणि अधूनमधून स्वतःच अस्तित्व दाखवणारी कौलारू घर...तस पाहिल तर सारच विलोभनीय...पण तरीही एका अधूरेपणाची जाणीव करून देणार...
ही वेळच अशी... रोज येणारी...पण एका वेगळ्याच विश्वात नेणारी...अनामिकशी हुरहुर लावणारी....कुणाची तरी खुप आठवण करून देणारी... तो नसल्याच सत्य पुन्हा पुन्हा जाणवून देणारी..आणि कुठे तरी मनाला हताश करणारी...
ही शांतता... एखाद्या कवीला भुरळ घालेल अशीच ...पण मला मात्र नकोशी झालीय...राहून राहून तेच तेच आठवतय...बंद मुठितुन वाळू निसटुन जावी तसा गेलास...अलगद...आणि मी मात्र वाट पाहत राहिले...वेड्यासारखी...कधी तरी येशील या आशेने आजही इथे येउन बसते.. स्वतःच्याच हाताकडे एकटक पाहत....वाटत...कुठून तरी येशील..माझ्या हातात हात गुम्फुन म्हणशील...ए वेडाबाई अशी का बसलियस ...आणि काय मागतेयस त्या सूर्याकड़े? त्याच तर स्वतःच भविष्य अंधारात चाललय...
आणि मग हातावर पडलेल्या थेम्बाकड़े बघून स्वतःच भानावर येते...मग कळत आपल्या मनाच आभाळ आता दाटून आलय...आणि ते तर काय बरसणारच..कारण हे काळे ढग दूर नेणारा वारा आता स्वतःच हरवलाय...का गेलास रे मला असा सोडून...? कळतच नाही माझ काय चुकल..वाटत कधीतरी येशील आणि म्हणशील "अग गम्मत करत होतो...रडुबाई...काय अवस्था करून घेतलीस..." माझे विस्कटलेले केस सावरून हळूच मला जवळ घेशील...पण त्याच वेळेस दुसर मन म्हणत नाही तो नाही येणार...कधीच नाही येणार...गेलाय तो खुप दूर....त्याच्या जगात आता तुला कुठेच जागा नाही...तुझ्याकडे आहेत ते फक्त ठसे...त्याच्या आठवणींचे...खुप खोलवर उमटलेले...कधीही पुसले न जाणारे...अशाच एखाद्या वेळी जागणारे...मनाला एकटेपणाची जाणीव करून देणारे...आणि न सरणारे हे क्षण अधिकच कठीण करणारे... मग इतका वेळ समजावलेल्या मनाला ग .दी. मांच्या ओळी पटायला लागतात ....
" या कातरवेळी पाहिजेस तू जवळी..."
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं......!
कधी कुणाला पाहून माझं मन एवढं दाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
अनमोल होते ते क्षण तुझ्या सवे घालविलेले,
नजरे नजरेतून बोलतांना मनातल्या भावना सांगितलेले,
त्याच क्षणांचा मी कधी गुलाम होईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
रम्य होती ती पहाट तुझ्या नजरेतून पाहिलेली,
आणि ती ढळती सांज तुझ्या सवे घलाविलेली,
तुझ्या विना जीवन एवढं नीरस होईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
आज नाहीस तू माझ्याकडे आहेत फक्त तुझ्या आठवणी,
हसावीणार्या रडावीणार्या हळव्या अश्या त्या आठवणी,
आठवणीनच्या पुरात मी वाहून जाईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
अस्तित्वासाठीही आज तुझी उणीव भासेल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "
तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"
मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..
आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........
फ़क्त मैत्री
"जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री
जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री ........तो विश्वाचा एक धागा असतो
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री..........."
मैत्री म्हणजे
"मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श
मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन
मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट
मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा
मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण
मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण
मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग"
आठवण.............
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
कुणीतरी हव असत.....
कुणीतरी हव असत.....
.
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....
कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......
कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........
कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........
कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........
कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......
डोळ्यातील अश्रू पडतात......!
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि
शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात
कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात
नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं......
कुणीतरी हव असत
कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........
कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....
कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...........
कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील कl विचारणार..........
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली......!
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!

छान कविता करता तुम्ही. तुघलक वरचा लेख पण वाचला मी.
ReplyDelete